पाटण : मुळगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मोळावडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुळगाव, ता. पाटण येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही, पेन व अंकलिपी तसेच मास्क चे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद शाळा मुळगाव मधील मुख्याध्यापक अरविंद पडवळ व प्रकाश जाधव तसेच शिक्षक विजय खांडके, योगिता बनसोडे, वर्षा स्वामी यांच्यासह मुळगाव गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेविका, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकानी प्रास्ताविक केले तर सौ. बनसोडे यांनी आभार मानले.
पांडुरंग मोळावडे हे नेहमीच सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात. त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले बद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.