महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले (फलटण शहर)
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस , मातोश्री शांताई महिरे यांच्या २४ वा स्मृती दिवस , तथा ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या जन्म दिवस ग्रंथपाल दिवस म्हणून उपरोक्त निमित्ताने वाचनालया मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनिलाल महिरे माध्यमिक शाळा पिंजारझाडी ता साक्री येथील उपमुख्याध्यापक रविंद्र महिरे , संजय मोहीते , लक्ष्मण पिंपळे , आदि उपस्थित होते श्री रविंद्र महिरे यांनी वाचनाचे महत्त्व , माजी राष्ट्रपती कलाम यांचा जीवनपट , या विषयावर मार्गदर्शन केले तर ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा व जीवनाचा परीचय धुळे जिल्हा ग्रंथालय संघ प्रमुख कार्यवाह राहुलकुमार महिरे यांनी करून दिला , प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले ,उपस्थितांचे आभार व कार्यक्रम सुत्रसंचालन राहुलकुमार महिरे यांनी केले .