महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा:-
कोरोना परिस्थिती मुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव करताना शासनाने काही अटी व नियम घालून दिल्या त्यासंबंधी तासगाव येथील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ चर्चेसाठी जमले असता त्यामध्ये एक मताने शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार साजरा करण्याचे ठरले. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, सर्कल,तलाठी, पोलीस कर्मचारी,आरोग्य सेवक, पदाधिकारी, व सर्व मंडळातील सदस्य उपस्थित होते.