फलटण प्रतिनिधी . अनिल पिसाळ
फलटण तालुक्यामध्ये कोरोना आपत्ती व्यवस्थापनामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेबाबत तसेच नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्यांची जागे वरती, घरी ,जाऊन माहिती घेणे त्यांचे हाय रिस्क व लो रिस्क संपर्क व्यक्ति यांना कोरान टाइन करणे, तसेच रुग्णांना कोरोना सेंटर येथे सकाळी नाष्टा, दुपारी व संध्याकाळी जेवण देणे अशी जोखमीची सेवा
मंडल अधिकारी जोशी व भांगे यांनी फलटण तालुक्यामध्ये केलेली आहे,व फलटणचे नायब तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब ,होळचे .मंडलाधिकारी भांगे अण्णा, संदीप जगदाळे, तलाठी लक्ष्मण अहिवळे, शिपाई बाळासाहेब जाधव, बाळासाहे भिसे, त्यांचे कामाची दखल घेऊन यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा , जिल्हाधिकारी सातारा . शेखर सिंह, पोलीस अधीक्षक सातपूते मॅडम, यांनी त्यांचे विशेष कौतुक करून त्यांना १५ ऑगस्ट २०२० स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जोशी व इतर अधिकारी यांना प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी फलटणचेउपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप ,यांच्या हस्ते प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी आमदार . दिपक चव्हाण ,तहसीलदार आर सी पाटील साहेब, व इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.






























