महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेत्रामधील नागरिकांना कोविड-19 च्या बचावासाठी प्रतीबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीचा पहिला व दुसरा डोस 12 ते 60 व त्यावरील नागरिकांना व मुलांना देणेत आलेला आहे. मलकापूर नगरपरिषदेने काले प्राथमिक आरोग्य केंद्र, मलकापूर उपकेंद्राच्या माध्यमातून आशा सेविकांमार्फत लसीकरणाचे उद्दीष्ठ सर्वांच्या सहकार्याने पुर्ण केलेले असल्याने मलकापूर शहरामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखणेस मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे.
मलकापूर शहरामध्ये 60 वर्षावरील एकूण 3728 नागरिकांना लस देणेत आलेली असून, या सर्व नागरिकांना पहिला व दुसरा डोस देणेत आलेला आहे. केंद्र व राज्य सरकारने जाहिर केलेल्या धोरणानुसार 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस देणेत येत असून, अद्याप शहरातील 1300 नागरिकांना उपलब्ध माहितीनुसार लसीचा बुस्टर डोस देणे बाकी आहे. यापूर्वी दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची तारिख विचारात घेऊन बुस्टर डोस देणेचे नियोजन करणेत आलेले आहे. मलकापूर शहरामध्ये अद्याप ज्या नागरिकांनी बुस्टर डोस घेतलेला नाही त्या नागरिकांना शहरामध्येच लस उपलब्ध व्हावी याकरिता रविवार दि.01 मे 2022 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भारती विद्यापीठ, मलकापूर या ठिकाणी सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 या वेळेत 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस देणेत येणार आहे. तरी या अभियानाचा मलकापूर शहरातील 60 वर्षावरील नागरिकांनी, नगरपरिषदेचे अधिकारी / कर्मचारी व कोविड- 19 मध्ये काम केलेल्या कोविड योध्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. मनोहर शिंदे यांनी केले.
याबाबत शनिवार, दि. 23/04/2022 रोजी लक्ष्मीनगर येथील बहुउद्देशिय इमारतीमध्ये प्रभाग अध्यक्ष, नोडल अधिकारी आशा सेविका यांचे उपस्थितीत नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, बांधकाम सभापती श्री. राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. गितांजली पाटील, नियोजन व शिक्षण समिती सभापती सौ. पुजा चव्हाण तसेच मुख्याधिकारी श्री. राहुल मर्ढेकर यांचे उपस्थितीत बैठकीचे नियोजन करणेत आले. सदर बैठकीस नगरसेविका सौ. अलका जगदाळे, सौ. भारती पाटील, सौ. आनंदी शिंदे, सौ. स्वाती तुपे, सौ. कमल कुराडे, सौ. नंदा भोसले, नगरसेवक श्री. प्रशांत चांदे, माजी नगरसेवक श्री. आनंदराव सुतार, आरोग्य विभागाचे डॉ. जयश्री देसाई, पर्यवेक्षक श्री. राजु पटेल, श्रीमती पावणे सिस्टर, नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक श्री ज्ञानदेव साळुंखे. नोडल अधिकारी श्री. पांडुरंग बोरगे, रामचंद्र शिंदे, बाजीराव येडगे, उमेश खंडागळे, शरद कदम, दादा शिंदे, जगन्नाथ मुडे, प्रसाद बुधे, सुभाष बागल, हेमंत पलंगे तसेच सर्व आशा सेविका व प्रभाग अध्यक्ष उपस्थित होत्या.