नगराध्यक्षांच्या दालनातच घातला प्रतिकात्मक महाळ
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :काेरेगांव
गेली वर्षभर बंद असलेल्या फिल्टरेशन प्लँटमुळे काेरेगांव शहरात सध्या दूषीत पाणीपुरवठा सुरु असून आज संतप्त नागरिकांनी आक्रमक पावित्र घेत चक्क नगराध्यक्षांच्या दालनातच प्रतिकात्मक महाळ घालून काेरेगांव नगरपंचायतीचा अनाेख्या पध्दतीने निषेध नाेंदविण्यात आला.
काेरेगांव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एम.आय.डी.सी. व रेल्वे स्टेशन येथील दाेन्हीही जल शुध्दीकरण प्रकल्प नादुरुस्त अवस्थेत असून मागील एप्रिल महिन्यापासून साेनेरी ग्रुप व काेरेगांव शहरातील विविध संघटना, नागरिकांनी नगरपंचायतीला वारंवार निवेदन देवून फिल्टरेशन प्लँट दुरुस्तीसाठी जनरेटा उभारला हाेता. मागील मे महिन्यांपासून नागरिक व नगरपंचायतीत वारंवार संघर्षही पेटला हाेता.
साेनेरी ग्रुपने नगरपंचायतीला घेराव घालून फिल्टरेशन प्लँट तात्काळ दुरुस्तीसाठी मागणीही केली हाेती, त्यावर निविदा प्रक्रिया सुरु करुन फिल्टरेशन प्लँट दुरुस्ती सुरु करीत असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले हाेते. मात्रब गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातत्याने गढूळ, माती मिश्रीत पाणी नागरिकांना नळाद्वारे मिळत असून त्यावर काेरेगांव शहरात संतप्त प्रतिक्रीया उमटत हाेत्या. आज सकाळी साेनेरी ग्रुपच्या सदस्यांसह शहरातील काही नागरिक निवेदन घेवून नगरपंचायतीला जाब विचारण्यासाठी गेले हाेते, बराचवेळ काेणीही निवेदन घेण्यासाठी येत नसल्याने साेनेरी ग्रुपच्या वतीने नगराध्यक्ष रेश्मा काेकरे यांच्या दालनात, रिकाम्या खुर्ची समाेरच प्रतिकात्मक महाळ घालून दुषीत पाण्याने ग्रस्त झालेल्या व मागील काही दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्या काेरेगांव मधील नागरिकांच्या स्मृतीस नैवेद्य दाखवून आदरांजली वाहण्यात आली. नगरपंचायतीचा एक सुध्दा जबाबदार पदाधिकारी, नगरसेवक निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित न राहिल्याने नागरिकांनी त्यांचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान, आंदाेलकांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या दालनात जावून आपले निवेदन सादर केले, त्यांनी तात्काळ नगरपंचायत अभियंता काकडे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख प्रताप बुधावले यांना बाेलावून घेत दूषीत पाणी पुरवठ्याबाबत जाब विचारला. तूरटी पुरवठादाराचे मागील बील का आदा केले नाही? अशी विचारणा करत त्यांनी संबंधीतांवर तिव्र शब्दात ताशेरे ओढले. तात्काळ तूरटी, ब्लिचींग उपलब्ध करुन उद्याचा पाणी पुरवठा शुध्द करुन देण्याचे आदेश त्यांनी संबंधीतांना जाग्यावरच दिले. आंदाेलकांची भूमिका समजावून घेत मी नगरपंचायतीच्या कामकाजात निश्चीत सुधारणा करुन दाखवेन अशी ग्वाही दिली.
आंदाेलकांच्या वतीने साेनेरी ग्रुपचे अध्यक्ष संताेष नलावडे, अजित बर्गे, अमर देशमुख, सुरज पवार, कविता माने, रविराज बर्गे, पवन भाेईटे, सम्राट थाेरात, साहिल तिवाटणे, महेश उंडाळे यांनी संबंधीतांवर प्रश्नांचा भडिमार केला.
साेनेरी ग्रुपने घातलेल्या या प्रतिकात्मक महाळाची चर्चा आज काेरेगांवात जाेरदार सुरु हाेती.