महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : फलटण
संभाजी ब्रिगेड फलटण च्या वतीने तहसीलदार साहेब यांना साबळे वाघीरे आणि कंपनी या विडी उत्पादक कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाजारात बिड्या आणल्या आहेत त्या बिड्याच्या बंडलावर छत्रपती संभाजी महाराजनच्या नावाचा वापर करण्याबाबत मनाई करण्या बाबत संभाजी ब्रिगेड चे सातारा जिल्हा अध्यक्ष विशाल शिंदे मराठा सेवा संघ सातारा जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब पवार,विनोद जाधव,अजित शिंदे,मयूर जगदाळे,दत्ताजी पवार,मनोज जगताप,तालुका अध्यक्ष विनीत शिंदे, सातारा जिल्हा सरचिटणीस प्रदीप घाडगे यांनी निवेदन दिले त्या निवेदनात म्हंटले आहे की साबळे वाघीरे आणि कंपनी या विडी उत्पादक कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाजारात विड्या आणल्या आहेत.
संभाजी महाराज राष्ट्रपुरूष आहेत . त्यांच्या नावाने अशा प्रकारे विड्यांची बंडल बाजारात आणणे ही छत्रपती संभाजी महाराजांचाच नव्हे तर महाराष्टासह संपूर्ण भारतातील जनतेचा अपमान आहे असे आमचे स्पष्ट मत आहे . आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी राष्ट्रपुरूषांच्या नावाचा उपयोग करणे अजिबात समर्थनीय नाही . छत्रपतीवर प्रेम करणाऱ्या प्रकारामुळे तमाम शंभुप्रेमी तरूण संतप्त झाला असून साबळे वाघीरे आणि कंपनीने आपल्या बिडी उत्पादनाचे नाव तात्काळ बदलावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे .
या विषयावर विविध संघटना पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण करीत असून या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त होण्यापुर्वीच राज्य सरकारने साबळे वाघीरे आणि कंपनीला नोटीस पाठवून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यास मनाई करावी ,अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या पद्धतीने आंदोलन केले जाईल..
यावेळी संभाजी ब्रिगेड चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
































