महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आले आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आले आहे. बुधवार पासून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.
राजू शेट्टी यांनी मागील महिन्यात राज्यभर दौरा, आंदोलन केले होते. यादरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांचा अहवाल पाच दिवसापूर्वी सकारात्मक आला. ते घरीच अलगीकरण होऊन वैद्यकीय उपचार घेत होते. काल रात्री त्यांच्या रक्तामध्ये दोष आढळल्याने जयसिंगपूर येथील डॉ. सतीश पाटील यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला होता. तर, पुढील वैद्यकीय उपचार चांगल्या पद्धतीने व्हावेत यासाठी त्यांना पुणे येथे हलवण्यात आले. प्राणवायू पुरवठा असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आहेत. येथे त्यांच्यावर ते करोनामुक्त होईपर्यंत उपचार केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ही सांगण्यात आले.