या सोहळ्यात शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यात शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
किल्ले रायगडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी, प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली. इतकेच नव्हे तर, प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केली. उदयनराजे यांनी प्रतापगड प्राधिकरणाची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मान देत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, आज या ऐतिहासिक सोहळ्याला ३५० वर्षे झाली. मी स्वत ला भाग्यवान समजतो, की या सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य लोकांचं काम कऱण्याची संधी आपल्याला मिळाली”, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.