पाटण व मोरगिरीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
पाटण प्रतिनिधी: पाटण व मोरगिरी येथे मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती महाराणा प्रताप चौक, मोरगिरी पेठशिवापूर मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या पराक्रम ची माहिती उपस्थित युवावर्गाला देण्यात आली. पाटण येथील छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती यांच्याकडून सायंकाळी 4:30 वाजता रथातून भव्य मिरवणूक पाटण तालुक्यातून शांततेच्या मार्गाने काढण्यात आली.7:30 वाजता पाटण मधील सर्व शंभूभक्त शिवभक्ता कडून महाराणा प्रताप चौक येथे शिववंदना कार्यक्रम पार पडला व मिरवणुकीची सांगता झाली.
मोरगिरी येथील छत्रपती संभाजी महाराज व शिवभक्तांच्या कडून 14 व 15 तारखेला किर्तन, व्याख्यान,मिरवणूक, दांडपट्टा मर्दानी खेळ, दुग्धाभिषेक, पारंपारिक वेशभूषा विविध उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर घेऊन एकूण 30 ते 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी संजय हिरवे, प्रभाळे साहेब, दिपक मांडावकर, प्रशांत चोपदार, व मोरणा विभागातील हिंदू संघटनेचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. पाटणमधील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंभू भक्त व शिवभक्त व रामपूर मधील युवक यांनी प्रयत्न केले.