मुंबई : नायगाव विभागातील बी.डी.डी.चाळींचा पुनर्विकास प्रकल्प तीन वर्षापूर्वी सरकारने बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एल अॕन्ड टी कंपनी विकासकाला जवाबदारी दिली होती .परंतु काही विविध कारणांमुळे एल अॕन्ड टी विकासाने अचानक माघार घेतली .ही बातमी जेव्हा प्रसिद्धी माध्यमानी वर्तमानपत्रात व टिव्ही चॕनलवर प्रसारित केल्यानंतर नायगाव विभागातील महिलांनमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले .वर्षानूवर्ष आपल्या स्वप्नातील घराची आतुरतेने वाट पाहत होत्या त्या पुनर्विकास प्रकल्पाची विकासकाने माघार घेतल्याने महिला वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले .परंतु काही दिवसातच तळागळातील सर्वसामान्य माणसांशी नाळ जुळलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ह्या पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित असलेल्या मंत्री व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून हा प्रकल्प मार्गी लावला .
तेथील पुनर्विकास प्रक्रियेतील समस्या ,त्रुटी ,दूर करून विकासास सुरूवात करावी तसेच भाडेकरुंचे योग्य स्थलांतर करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यानी दिले.त्या बी.डी.डी.चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला पुन्हा नव्याने हिरवा कंदील दाखविल्यामुळे तसेच आशेचा किरण दाखवल्याने नायगाव मधील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नायगाव मधील महिला हा आनंद द्विगुणीत साजरा करीत असताना .नायगाव मधील समाजसेविका मुद्रा महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.ज्योती मनोज माने यांच्या तोंडून उदगार निघाले की आमच्या सर्वसामान्य जनतेची जाणीव असलेल्या मुख्यमंत्र्यानी दिवाळीपुर्वीच आम्हा महिला भगिनिंना भाऊबीज भेट दिली .
त्यांनी हा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने मार्गी लावल्याने नायगाव मधील महिला भगिनींनच्या वतीने तसेच मुद्रा महिला बचत गटाच्या वतीने माननिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार पत्राद्वारे मानले .