महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (सातारा) : राहुल ताटे -पाटील
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय कराड यांच्यावतीने कठापूर येथे ग्रामीण कृषी जागृतता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जुलैपासून विविध कृषीविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत कृषिदूत रोशन ज्ञानेश्वर देशमुख यांनी गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना आधुनिक शेती करत असताना मातीचे नमुने कसे घ्यावेत, शेतीमध्ये इंटरनेट व ॲप चा वापर, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण तसेच व्यवस्थापन , पशुपालन या बद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी ज्ञानेश्वर देशमुख,अशोक केंजळे,विकास देशमुख ,मयूर केंजळे सर , किरण देशमुख, विनोद फडतरे, इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर.आर सूर्यवंशी सर, कार्यक्रम समन्वयक डॉ. डी.एस.नावडकर सर , कार्यक्रमाधिकारी डॉ.एस.एस.कोळपे सर यांनी मार्गदर्शन केले.