महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कोरेगाव
महाराष्ट्रातील बहुसंख्य आणि मुख्य समाज असणाऱ्या मराठा आरक्षणाला मा.सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिलेली आहे तसेच सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे अशा परिस्थिती मध्ये दिनांक 16 सप्टेंबर 2020 रोजी च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकारने पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे
सदर निर्णयाचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि जीवन-मरणाचा प्रश्न असणारे मराठा आरक्षण सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे न्यायप्रविष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस शिपाई भरतीसाठी सुमारे १२,५३८ इतकी पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे सदरचा हा निर्णय मराठा समाजावर सरळसरळ अन्याय करणारा आणि आधीच मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थितीमुळे चिडलेल्या मराठा समाजाच्या जखमेवर मीठ होणार आहे मराठा आरक्षणाला स्थगिती असताना अशा प्रकारची पोलीस भरती काढणे म्हणजे मराठा समाजाचा आणि मराठा तरुणांचा नोकरीचा हक्क सरळ सरळ जाणीपूर्वक राहण्यासारखे आहे आपल्या शासनाचा सदर निर्णय मराठा समाजाचा भावना तीव्र करणारा आणि मराठा समाजाला जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न आहे असा आमचा आपल्या महाविकास आघाडी सरकारवर थेट आरोप आहे या निमित्ताने आम्ही आपणास सूचित करू इच्छितो कि जो पर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही
तोपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली संभाव्य पोलीस शिपाई भरती स्थगित करण्यात यावी तसेच जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील शासनाच्या कुठल्याही विभागातील कोणत्याही स्वरूपाची नोकर भरती करण्यात येऊ नये या उपर आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पोलीस भरतीचा सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही संभाजी ब्रिगेड च्या वतीने या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडू व नंतर निर्माण त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही महाविकास आघाडी सरकार पूर्ण जबाबदार राहील याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती अश्या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा कोरेगाव शहराच्या वतीने देण्यात आले .
यावेळी शिवश्री जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव ,तालुका अध्यक्ष राहुल बर्गे, शहराध्यक्ष आनंदराव बर्गे ,विनय फडतरे ,लहू सामंत, वैभव जगदाळे ,रुपेश सपकाळ ,रोहित जाधव ,विनोद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
































