
येथील उपक्रमशील शिक्षिका वैशाली खाडे या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळण्यासाठी विविध उपक्रमांचे नियमित आयोजन करत असतात यावेळी महिला दिनानिमित्त त्यांनी चक्क विद्यार्थ्यांना शेतामध्ये थेट बैलगाडीत बसवून फेरफटका मारला आहे. अलीकडच्या काळात बैलजोडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.या वेगळ्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद दिसत होता.
रानमळा ही शाळा दहिवडी पासून 3 किलोमिटर अंतरावर आहे पण या ठिकाणी दहिवडी शहरातून विद्यार्थी येतात या शहरी भागातील मुलांना व पालकांना बैलगाडी मध्ये बसण्याचा व बैलगाडीतून फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.
































