महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने सरपंचाच्या वैयक्तिक सांडपाणी व शेतीमधील पाणी सोडण्यासाठी हे बंदिस्त गटाचे योजना राबवली गेली होती काय असा प्रश्न वार्ड क्रमांक चार मधील प्रकाश नगर येथील लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी वेळो वेळी तोंडी ग्रामसेवक यांना सांगून सुद्धा याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही या बंदिस्त गटाच्या खालून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सुद्धा केलेली आहे यामुळे येथील लोकांच्या आरोग्य विषयक जीवितास धोका निर्माण झाला आहे.
या लोकवस्तीमध्ये मजूरवर्ग राहत असून यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून यांच्या आरोग्यविषयक काही धोका निर्माण झाला तर यास ग्रामसेवक माजी सरपंच उपसरपंच व सदस्य जबाबदार राहतील असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला असून याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
































