फलटण प्रतिनिधी- .आज संपूर्ण भारतामध्ये महान व्यक्ती पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी केली जाते महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशानुसार व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्या सूचनेनुसार फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती कामगार नेते बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते प्रतिमेस पूजन करुन साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे उपस्थित होते यावेळी बोलताना जयकुमार शिंदे म्हणाले की पंडित दीनदयाळ उपाध्याय आजच्या नव्या पिढीसाठी खूप प्रेरणास्तोत्रे व्यक्तिमत्व होते. अत्यंत हालकीतुन जीवनाचा प्रवास सुरू करून समाजाच्या शेवटच्या घटकांसाठी काम करणार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रेरणादायी होते. लहानपणीच आई-वडिलांचे मायेचे छत्र हरपलं आणि जीवनाच्या संघर्षाला सुरुवात झाली अशा परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून विसाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर हेडगेवार यांच्या सहवासात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले . आपलं संपूर्ण जीवन हे राष्ट्र सेवेसाठी अर्पित केले. साधी राहणी उच्च विचार ही त्यांची जीवनशैली हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं. शास्त्र धर्मग्रंथ एकात्म मानव वाद हा सिद्धांत मांडला व हा भारतीय जीवनाचा एक अंग बनला. शिक्षणतज्ञ, राजकारणाचे जाणकार, पत्रकार, लेखक तत्वज्ञानी अशी त्यांची ओळख होती .त्यांच्या कार्याचा आवाका खूप मोठा होता गरिबाच्या गरीबातल शेवटच्या घटकाचा विचार ते नेहमी करायचे. जनसंघाचे ते महामंत्री म्हणून नंतरच्या काळात अध्यक्ष म्हणून त्यांचं काम खूप मोठं होतं. त्यांच्या पुण्याई मुळेच आज भारतीय जनता पक्षाची भरभराट आपण पाहत आहोत .डॉक्टर हेडगेवार नेहमी म्हणायचे की मला दोनच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे सारखे कार्यकर्ते मिळाले तर मी भारताचा नक्शा बदलल्याशिवाय राहणार नाही .असे निष्ठावंत समाजासाठी झटणारे व्यक्तींची आज जयंती आपण साजरी करत आहोत .त्यांना विनम्र अभिवादन करतो .. व नव्या पिढीने त्यांचे आदर्श मूल्य जपावेत ही अपेक्षा यानिमित्ताने आपण करूया .. यावेळी् कोळकी चे नेते संदीप नेवसे, रणजीत जाधव, सुधीर जगदाळे, प्रदीप भरते, राजेंद्र जगदाळे, विशाल घोरपडे , नितिन काटकर , अभिजीत शिंदे, पै. रणजीत काशिद, पार्थ पोरे, समर्थ नेवसे, गणेश वाकोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.