महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (कोल्हापूर) : आरती बनसोडे
कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर कोल्हापूर मध्ये ‘आम्ही कोल्हापूरी पोषणात लय भारी’ या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पोषण माह कार्यक्रम घेत आहेत.
“सही पोषण देश रोशन”यामध्ये किशोर मुली,गरोदर माता,स्तनदामाता ०ते६ वयोगटातील लाभार्थी यांना आहार व आरोग्यविषयी मार्गदर्शन करण्यात आले.आहाराचे विविध प्रात्यक्षिक घेण्यात आले.कोरोनाचा काळ असल्याने घरोघरी जाऊन या विषयी जनजागृती सुरू आहे.
त्याचबरोबर वारंवार हात धुणे.गरम पाणी पिणे,सर्दी , ताप असल्यास दवाखान्यात जाणे.मास्कचा वापर करणे.गर्दीत जाणे टाळणे.असे विविध कार्यक्रम पोषण माह या कार्यक्रमात घेण्यात येत आहेत . यावेळी सोमनाथ रसाळ यांनी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमास ज्योती पाटील (CDPO),पर्यवेक्षिका पी बी भांडरे अंगणवाडी सेविका,नंदा गवळी.योगिता शिंदे संगिता हुपरे.माया गाडगीळ.महादेवी माळी.नंदा सोनुले.व सर्व मदतनीस उपस्थित होते .