महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :कराड
मायक्रो फायनान्स ची चाललेली शक्तीची जबरदस्तीची कर्जवसुली थांबवा. ग्रामीण कट्टा, फायनान्स. बजाज फायनान्स, उज्वल फायनान्स, रत्नाकर फायनान्स, मु(Moo) फायनान्स. आपल्या कार्यालयात तात्काळ सर्व मायक्रोफायनान्स चे जबाबदार अधिकारी व आमची तात्काळ आपल्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवावी, या विषयास अनुसरून बळीराजा शेतकरी संघटना कराड यांच्या वतीने प्रांत अधिकारी कराड यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाचे संक्रमण गेली सात ते आठ महिने चालू आहे. उद्योगधंदे बंद पडले, बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सर्वसामान्य लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे दोन वेळचे जेवण सुद्धा मिळणे मुश्कील आहे. काही महिला भगिनींनी मायक्रोफायनान्स, ग्रामीण कट्टा, उज्वल फायनान्स, रत्नाकर फायनान्स, मुंबई फायनान्स. अशा फायनान्स कंपन्याकडून घरगुती कारणासाठी कर्ज उचलली होती. कोरोना चा संसर्ग नव्हता तेव्हा महिला भगिनी अगदी वेळेवर हप्ते भरत होत्या. परंतु कोरोना मध्ये प्रचंड अडचणींना सर्वसामान्य लोकांना सामोरे जावे लागत आहे.
मायक्रोफायनान्स या कर्ज वसुलीचा तगादा लावत आहे. काही वसुली कर्मचारी महिलांना असभ्य भाषेत शिवीगाळ दमदाटी करत आहेत. अशी सक्तीची कर्ज वसुली करणार्यांना वेळीच चाप लावावा. राज्य शासनाने तसेच विभागीय आयुक्त पुणे यांनी सक्तीची कर्ज वसुली करू नका, जर केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तरीही सक्तीची कर्ज वसुली चालू आहे. तरी आपण तात्काळ सर्व मायक्रोफायनान्स अधिकारी व आमची आपल्या कार्यालयात मीटिंग बोलवावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल.तसेच त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी व्यक्त केले. यावेळी यावेळी बळीराजा शेतकरी संघटना कराड यांचे पदाधिकारी तसेच सभासद कार्यकर्ते व कर्ज धारक महिला उपस्थित होत्या.