महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / दहिवडी :
सातारा दहिवडी रस्त्यावर असलेल्या पिंगळी गावाजवळील पूल सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे पाण्याखाली गेला होता. या पुलावर गुडघ्या पेक्षा जास्त पाणी होते तरीही चालक या पाण्यातून वाट वाट काढत असताना या पुलावर असलेल्या मोठ्या खड्यात गाडी अचानक आदळून गाडी पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने ओढली जायची. पुलावर गुडघाभर पाणी असल्यामुळे हे खड्डे बाहेरून दिसत नाहीत. पर्याय नसल्याने चालकांना आपला जीव मुठीत धरून पाण्यातील खड्डे चुकवून बाहेर पडावे लागत होते.
आता पाऊस बंद झाला आणि सर्व नदी नाले ओढे यांची पाण्याची पातळी कमी कमी झाली तेव्हा ज्या पुलावरून पाणी जायचे त्या पुलावर किती मोठे खड्डे होते हे पहिले नंतर स्वतःच चालक आश्चर्य करायला लागले की एवढ्या मोठ्या खड्ड्यात आपण गाडी घातली. जर हा खड्डा दिसत असता तर यातून गाडी घातली नसती. या पुलावर हे खड्डे पाऊस सुरु होण्याच्या अगोदर पासून आहेत. गावातील लोकांनी तक्रार करून देखील याकडे जाणून बुजून दुर्लक्ष बांधकाम विभाग करत आहे वाटत आहे.
आतापर्यंत ह्या खड्यात बरेच दुचाकीस्वार पडले आहेत. चारचाकी गाड्यांचे पाटेही तुटले आहेत. विशेष म्हणजे हा मार्ग सातारा आणि कराड या मोठ्या शहरांना जोडलेला असूनही बांधकाम विभाग का दुर्लक्ष करत आहे याचे गणित अजून कोणाला उलघडले नाही. खड्ड्यात आदळून गाडी पडल्याने अनेकांचे गुडघे फुटलेत अंगाला जखमा झालेत. परंतु कोणाचा जीव जातोय का असे बांधकाम विभाग वाट पाहतंय का असा सवाल जनतेतून निर्माण होत आहे