महाराष्ट्र न्यूज मुळगाव प्रतिनिधी :
पाटण तालुका शिक्षक संघाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.यामध्ये पाटण तालुका शिक्षक संघाच्या नेते पदी ज्ञानेश्वर खैरमोडे, तालुका अध्यक्ष पदी शशिकांत कांबळे तर उपाध्यक्ष पदी संतोष डवरे व प्रमुख संघटक पदी ज्ञानेश्वर शिर्के यांची एकमताने निवड करण्यात आली.
निवड झाल्यानंतर पाटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीचा सत्कार मा.सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले कि आम्ही शिक्षक संघाच्या पाठीशी आहोत मा. संभाजीराव थोरात (तात्या) यांचे कार्य मोठे असल्याचे सांगून शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नासाठी शिक्षक संघाच्या पाठीशी ठामपणे राहू असे सांगितले.याप्रसंगी पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष बापूराव टोळे, शिक्षक संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय खांडके, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पडवळ,कराड पाटण शिक्षक सोसायटी माजी चेयरमन आर.आर. पाटील,संचालक बापू पवार,बाबाजी साबळे यांच्या सह संघटनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी तालुका कार्यकारणी सदस्य व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.
































