महाराष्ठ्र न्यूज प्रतिनिधी :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पालिका प्रशासनाचा निर्णय: टेबललॅन्ड सहित पारशी सिडने पॉईंट सुद्धा बंदच
पांचगणी:- गेल्या सहा कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे महिन्यापासून पर्यटन स्थळे बंद आहेत. आता शासनाने ई पास रद्द केल्याने हॉटेल तसेच लॉज धारकांना परवानगी दिली असली तर कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता. पांचगणी पर्यटन स्थळावरील प्रेक्षणीय स्थळे मात्र पर्यटकांस फिरण्यास बंदच राहणार आहेत. आजच पांचगणी नगरपरिषदेने टेबललॅन्डला जाणारा रस्ता बंद केला आहे.देशात सद्या सर्वत्र अनलॉक प्रक्रिया चालू झाली आहेत. बिगेन वन्स अगेंन चालू झाले आहे. त्याच अंतर्गत जिल्हाबंदी उठून ई- पास प्रक्रिया रद्द झाली. त्यामुळे खाजगी वाहनातून पर्यटक स्वतःच्या मालकीच्या तसेच मित्रपरीवाराकडे येऊन राहू शकतात. त्यातच अँनलॉक फोर मध्ये हॉटेल, लॉज धारकांना परवानगी दिल्याने गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पांचगणी नगरपरिषदेने चेकपोस्ट वर येणाऱ्या पर्यटकांची नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. ते आल्यावर कोठे रहाणार आहेत. तसेच किती दिवस थांबणार आहेत. याची माहिती घेत त्यानां पर्यटन स्थळावर असणाऱ्या पर्यटन ठिकाणांवर फिरण्यास बंदी असणार आहे. त्याच बरोबर यांच्यावर विशेष पर्यटन पथकांमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. पांचगणी शहर परिसरात गेल्या पंधरा दिवसात वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पहाता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या निमित्ताने पॉईंट वर होणारी गर्दी टाळून कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.

सध्या अनलॉक फॉर प्रक्रियेमुळे पर्यटकांची रहदारी तर वाढणारच आहे. त्यामध्ये अगोदरच शहर परिसरात कोरोनाचा फैलाव वाढतोय त्याला अटकाव घालणे गरजेचं आहे.
प्रतिक्रिया:- सद्या कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्याकरिता लोकांनी गर्दी करू नये, स्वतःच सेल्फ राहत मास्कचा वापर करावा. आपल्या शहरात होणारा कोरोना संसर्ग रोखण्यास पालिका प्रशासनास मदत करावी. असे आवाहन पालिका प्रशासनाने वतीने करण्यात आले आहे.गिरीश दापकेकर मुख्याधिकारी पांचगणी नगरपरिषद.






























