जिहे येथील वाळूसाठी विक्रमी बोली
सातारा जिल्ह्यात वाळू लिलावासाठी पहिल्या टप्प्याच्या लिलावासाठी व्यवसायकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सदर लिलावाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये सर्वात मोठी विक्रमी बोली जिहे येथील कृष्णानदी पात्रातील वाळू उपशासाठी लागलीआहे.
कित्येक दिवस सातारा जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रिया न झाल्याने वाळू व्यावसाायिकांनी सदर लिलावास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला,
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यासाठी सातारा तालुक्यातील तीन ठिकाणी बोली लागली. यामध्ये सर्वात मोठी विक्रमी बोली जिहे येथील कृष्णानदी पात्रातील वाळू साठी लागली आहे. सातारा तालुक्यात सोनगाव सं. निंब व क्षेत्र माहुली परिसरातील कृष्णा नदी पात्रातील वाळूसाठी लिलाव झाला.
त्याच बरोबर अवैध वाळू उत्खननात अग्रेसर राहिलेल्या खटाव-माण तालुक्यातील येरळा व माणगंगा नदी पात्रातील वाळूसाठी लिलाव पार पडला. यामध्ये वरकुटे म्हसवड, म्हसवड डावरे वस्ती, म्हसवड-1, वरकुटे-म्हसवड -2 या परिसरातील नदी पात्रातील वाळू लिलाव पार पडला.

कोरेगाव तालुक्यातील वसना नदी पात्रातील बोबडेवाडी, देऊर तर कराड तालुक्यातील औंड येथील दक्षिण मांड नदी पात्र, तर खटाव तालुक्यातील पिंपरी, निमसोड गावालगतच्या येरळा नदी पात्रातील वाळू लिलाव प्रक्रियेस उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
सदर वाळू लिलाव प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील घर बांधकाम करणार्यांना या वाळू लिलावामुळे दिलासा मिळणार आहे. कारण यापुर्वी घर व इमारत बांधकामासाठी क्रशसॅन्डची मागणी वाढलेली होती. व मागणी वाढल्यामुळे दर सुध्दा महागले होते. परंतु यालिलाव प्रक्रियेमुळे दिलास मिळेल अशी आशा आहे.





















