फलटण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दि.26 रोजी माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण आणि अकलूज दौऱ्यावर येणार असल्याची माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फलटण येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खा. रणजितसिंह बोलत होते.यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे,स्वराज नागरी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर,बाळासाहेब काशीद,तेजस माने,युवराज सस्ते,
राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दौरा करत असून त्याचा शेवट माढा लोकसभा मतदारसंघात होत आहे.दि.26 रोजी सकाळी 10.30 वा घर चलो अभियान अंतर्गत छ.शिवाजीमहाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात पायी जात व्यापारी,सर्वसामान्य लोकांना भेटणार आहेत.यावेळी ते केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विविध विकास कामाबाबत जनतेचे विचार ऐकून सूचनाही स्वीकारणार आहेत.जनतेशी थेट चर्चा करणार आहेत.
या वेळी शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा लाभार्थी मेळावा होणार आहे. आ. जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील उपस्थित राहणार आहेत. याचवेळी विविध मान्यवरांचा भाजपा मध्ये प्रवेश होणार आहे.त्यानंतर ते अकलूज येथे जाणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याची खासदार गटाकडून फलटण येथे जोरदार तयारी सुरू केली आहे.