महाराष्ट्र न्यूज पाटण प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बी. ए. भाग तीन राज्यशास्त्र विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची ऑनलाईन कार्यशाळा गुगल मिट या ऍप द्वारे नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत सेमिस्टर ५ व ६ चे मधील ‘आंतरराष्ट्रीय राजकारण व भारताचे परराष्ट्र धोरण’ या विषया वर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यशाळेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रविंद्र भणगे, कळे महाविद्यालयाचे डॉ. शार्दुल सेलूकर, राज्यशास्त्र विषयाचे राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार, गडहिंग्लज कॉलेजचे डॉ. अनिल पाटील हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. तर कार्यशाळेच्या अध्यक्षपदी कोयना शिक्षण संस्थेचे तरुण तडफदार युवा संचालक संजीव चव्हाण हे होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना प्रा. विजय पानस्कर यांनी सर्वांचे स्वागत केले म्हणाले कि आजच्या कोरोनासासारख्या परिस्थितीत जागतिक राजकारण फार वेगाने बदलत आहे याची अभ्यास करणे आज आवश्यक बनले आहे.असे मत व्यक्त केले. प्रथम सत्रात शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रविंद्र भणगे यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण त्याचे स्वरूप आणि व्याप्ती या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. शार्दुल सेलूकर यांनी राजनय व त्याचे प्रकार आणि बदलती जागतिक परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयाचे राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी भारताचे परराष्ट्र धोरण यावर सखोल विवेचन केले तर डॉ. अनिल पाटील यांनी भारताचे शेजारी राष्ट्राचे असणारे सबंध यावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. पवार यानी जागतिक राजकारणाचे बदलते संदर्भ आणि भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे या विषयावर विवेचन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संचालक संजीव चव्हाण यांनी कोयना शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि त्यांनी बदलत्या जागतिक राजकारणा संदर्भात आपले मत व्यक्त केले.व कोरोना काळात सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असे शेवटी म्हणाले
कार्यशाळेच्या शेवटी नँक समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत फडणीस यानी सर्वांचे आभार मानले. कार्यशाळेत सातारा सांगली व कोल्हापूर मधील बहुसंख्य प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता.
सदर कार्यशाळा संपन्न करण्यासाठी बी.सी.ए.विभागाचे प्रा.अनिल सुतार, प्रा.श्रीगणेश गायकवाड, प्रा.अमोल मोहिते, प्रा.साहिल हकीम यांनी विशेष परिश्रम घेतले.






















