महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार :
फलटण तालुक्यातील उपळवे येथील स्वराज इंडिया ॲग्रो कारखान्यांमध्ये पितळ चोरीप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सदर चोरीची फिर्याद अनिलकुमार पांडुरंग तावरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार,कारखान्यांत स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी तीन लाख १४हजार ७५२रुपये किमतीचे पितळी गण मेटल बुश १४१,२३२ रुपये किमतीचे २४० किलो व १३ लायनर सेटच्या जाळ्या याची प्रत्येकी किंमत १०८६४असे एकूण३१४,७५२रुपये चोरी केली असून या मधील आरोपी १ ) विक्रम गणेश जगदाळे वय २३ वर्षे रा सांगवी ता.बारामती जि.पुणे २ ) शशीकांत विष्णु कदम वय ३० वर्षे रा. दऱ्याचीवाडी ता.फलटण ३ ) अक्षय रामचंद्र जाधव वय २३ वर्षे रा.श्रीरामनगर उपळये ता.फलटण ४ ) अमोल अरविंद शिंदे वय ५२ वर्षे रा.शिंदेवाडी ता.फलटण जि.सातारा सर्व आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्यावर भा द वि ३८१ नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यु एस शेख करत आहेत.