शासननोंदी व पंरपरेनुसार
सासनकाठीचा मान पाडळीचा. पत्रकार परिषदेत ट्रस्टची माहीती
पाडळी ता.सातारा येथील मानाच्या सासनकाठीचे रविवार दि.२ एप्रिल रोजी वाडी रत्नागिरी कडे प्रस्थान होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
वाडी रत्नागिरी (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री जोतिर्लिंग हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान.दरवर्षी चैत्रात येथे मोठी यात्रा भरते. या यंत्रे प्रसंगी आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणूक सोहळ्यात राज्यातील विविध मानाच्या सासनकाठ्या सहभागी होत असतात.त्यात पाडळी येथील मानाच्या सासनकाठीला मनाचे अग्रस्थान असते.
यंदा बुधवार दि.५ रोजी वाडी रत्नागिरी येथे जोतिबा देवाची यात्रा होणार आहे.त्या यात्रेत सहभागी होण्यासाठी पाडळी येथील सासनकाठीचे रविवारी सकाळी ६ ते साडे दहा या वेळेत पावक्ताच्या माळा वरून प्रस्थान होणार आहे. त्या नंतर ही सासन काठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसोबत पाली, इंदोली, कासेगाव,किणी वाठार,ऐतवडे,केखले या मार्गाने वाडी रत्नागिरी कडे पोहचणार आहे.छबिना सोहळा झाल्यानंतर गुरुवारी काठीला तोफांची सलामी दिली जाईल व त्या नंतर सासनकाठीचा परतीचा प्रवास सुरु होऊन सासन काठी गावाकडे परतेल.
या दरम्यान खा.श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी आरती होणार असल्याची माहिती यात्रा कमितीकडून देण्यात आली आहे.रविवारी सायंकाळी सासन काठीचे पाडळी येथे आगमन होणार आहे. दरम्यान सासनकाठीचा प्रस्थान व आगमन या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट च्या वतीने देण्यात आली यावेळी ट्रस्टचे चेअरमन रविंद्र ढाणे,सरपंच अमर ढाणे,सोसायटी चेअरमन दिपक ढाणे,तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी ढाणे,विश्वस्त कुलदीप ढाणे,सुशांत ढाणे,अतुल ढाणे,दिलीप ढाणे,संदीप ढाणे,बापू ढाणे व ग्रामस्थ उपस्थित होते
चौकट
पाडळी गावच्या सासनकाठीला 200 वर्षापेक्षा जास्त परंपरा असून यासंदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती येथे नोंद असून कोल्हापूर समितीच्या सचिवांनी या संदर्भात लेखी पत्र श्री जोतिर्लिग देवस्थान ट्रस्ट पाडळी यांना दिले असून मानाची सासनकाठी क्रमांक 1 पाडळी (निनाम)ता.जि.सातारा
या गावाला असणारा परंपरेनुसार सासनकाठीचा मान कायम ठेवून देवस्थान व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र समिती कोल्हापूर आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आदेशित केले असर्याचे पत्र जोतिर्लिग देवस्थान ट्रस्ट पाडळी यांनी पत्रकार परिषदेत सादर केले






















