महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार :
होळ ता फलटण येथे रसायनमिश्रित दूषित पाण्याने नीरा नदीमध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडले असून पाण्यावर माशांचा तवंग आला असून हे रसायनमिश्रित पाणी कोणी सोडले याची चौकशी करून प्रदूषण महामंडळाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नदीमधल्या पाण्याला गटाराचे स्वरूप आले असून अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी निरा नदीमध्ये वाहत असून होळ व आजूबाजूच्या गावातील बंदाऱ्याच्या पाण्यावर हजारो मासे मृत होऊन तरंगत आहेत या दूषित पाण्याने लोकांच्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला असून नदीच्या पाण्यामध्ये दूषित पाणी कुठून सोडले जात आहे याचा तपास प्रदूषण महामंडळाने करावा व संबंधितांवर कडक कारवाही करण्याची मागणी नागरिक करत आहेत.