उंब्रज-प्रतिनिधी :
उंब्रज येथील वरदराज मंगल कार्यालयासमोर रस्ते विकास महामंडळाच्या चुकीच्या नियोजनामुळे धोकादायक चौक तयार झाला आहे , राष्ट्रीय महामार्गावरून उतरून मसूरकडे जाणाऱ्या वाहनाला महामार्ग सोडून सेवा रस्त्याला उतरावे लागत असताना , उंब्रज गावातून कराडच्या दिशेने महामार्गावर जाणाऱ्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे , वरचेवर इथे छोटे-मोठे अपघात होत असतात , या ठिकाणी वाहनांची नेहमीच वर्दळ असते , पुढे जाऊन गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही , रस्ते विकास महामंडळाने गांधारीची भूमिका सोडून या ठिकाणी ” रस्तादुभाजक किंवा गतिरोधक ” यांसारख्या योग्य त्या उपाययोजना करून नागरिकांना आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून कायमची सुटका करावी , अन्यथा शिवसेना उ.बा. ठा. च्या रोषाला सामोरे जावे लागेल , असा गर्भीत इशारा शिवसेना उ.बा.ठा गटाचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी दिला आहे.






















