फलटण : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्य सरकारने केलेली अटक ही राजकीय सुडबुध्दीने करण्यात आली आहे. भाजपाच्या जनादेश यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे हे सामान्य जनतेसाठी हे सरकार काम करत नाही ही भावना वाढीला लागली आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकार भाजप शी सुड बुद्धी ने वागत आहे.जनतेचे दोषामुळे ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळे अगोदरच दोन ते तीन दिवस जनादेश यात्रेच्या विरुद्ध मुंबई मध्ये ४० च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आले. याचाच पुढचा सुडाचा अध्याय म्हणून कायद्याला धाब्यावर बसवून आणि पोलीस यंत्रणेला हाताशी धरून बेकायदेशीरपणे ही अटक करण्यात आली. या घटनेचा तीव्र निषेध करणारे निवेदन फलटण तालुका व शहर, भाजपा च्या वतीने फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप व तहसीलदार समीर यादव यांना करण्यात आले .या झालेल्या घटनेचा फलटण तालुका व शहर भाजपा च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा मोर्चाचे राज्य संघटक सुशांत निंबाळकर, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष नितिन वाघ, निलेश चिचकर, युवा मोर्चाचे विशाल नलवडे, सुरज तांदळे, ओबीसी सेलचे माऊली नाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






















