सातारा : मागील काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात येऊन केरळ पोलिसांनी सोने चोरी प्रकरणात साताऱ्यातील काही जणांना अटक करण्यात आली होती. याचा तपास केला असता हळू- हळू मोठी नाव पुढे येऊ लागली आहेत. या बड्या आरोपीना शोधत काल रात्री परत एकदा केरळ पोलिसांनी साताऱ्यात शोध मोहीम राबवली आहे. केरळ येथील बँकेतून साडे सात किलो सोने चोरल्याप्रकरणी निखिल उर्फ निक जोशी केरळ पोलिसांच्या अटकेत आहे.
त्याने दिलेल्या माहितीनुसार केरळ पोलिसांनी सातारा येथील एका सराफास अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी आज सायंकाळी सातारा येथील सराफी दुकानातून साडे तीन किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात हात असणाऱ्या सातारा येथील एका डॉक्टराची चारचाकी देखील जप्त केली आहे. सध्या केरळ पोलिसांकडून गायब असलेल्या डॉक्टरचा आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.