बारामती ता.०७ -: कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेनेकडून ग्रामविकासाचा तयार करण्यात आलेला आराखडा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्यांना प्रेरणादायी ठरणार… असे मत श्रीमती प्रांजल शिंदे सहयोगी प्राध्यापक यशदा यांनी व्यक्त केले..
सुनील निंबाळकर / बारामती प्रतिनिधी…
कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेचे शेती,शेतीपूरक व्यवसाय,प्रक्रिया उद्योग,पशुसंवर्धन अशा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य डोळ्यासमोर ठेवून ग्रामविकासाचा तयार करण्यात आलेला आराखडा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्यांना प्रेरणादायी ठरणार.असे मत श्रीमती प्रांजल शिंदे सहयोगी प्राध्यापक यशदा यांनी व्यक्त केले.*
कृषी विज्ञान केंद्र बारामती ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकासात काम करणाऱ्या नागरिकांना शेती,शेतीपूरक व्यवसाय,पशुसंवर्धन,डेअरी प्रक्रिया उद्योग अशा वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी आयडियल मॉडेल असल्याचे श्रीमती प्रांजल शिंदे यांनी सांगितले.
कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे मार्गदर्शन आणि यशदा पुणे या प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य
आणि गांव विकास कार्यक्रमात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ग्रामविकासात सक्षम करण्यासाठी शेती,शेतीपूरक व्यवसाय,पशुसंवर्धन अशा विषयाचा नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याचे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी यांना प्रशिक्षण देऊन गावातील नागरिकांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.या अनुषंगाने नुकतेच शासकीय आणि सामाजिक प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी आणि अधिकारी असे 50 मास्टर ट्रेनर तयार करण्याचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.यावेळी विवेक भोईटे,रतन जाधव,संतोष करंजे, संतोष गोडसे,महेश जाधव, विषयतज्ञ के.व्ही.के बारामती यांनी मार्गदर्शन केले.तर श्री.महेंद्र पांगळ प्राचार्य ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था लातूर,श्री.विजय जाधव प्राचार्य रयत प्रशिक्षण संस्था सातारा, श्री.शंतनू खानविलकर राज्य प्रशिक्षक यशदा,श्री.सचिन खलाटे प्रशिक्षण प्रमुख के.व्ही.के.यांनी आराखडा तयार करण्याचे काम केले.
या कार्यक्रमाला लातूर,परभणी,कोकण,हिंगोली,गडचिरोली,जळगांव येथील अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते.