कोल्हापूर : ज्या विरांगनेपुढे औरंगजेब निष्प्रभ ठरला अशी, हिंदुत्व रक्षणासाठी मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले अश्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ,आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री ताराराणीं अशा या रणरागिणीची शौर्य गाथा सर्वांपर्यंत पोहचावी या उद्देशाने सोनी मराठी घेऊन येत आहे स्वराज्य सौदामिनी ताराराणी.
या मालिकेनिमित्त १४ नोव्हेंबर रविवारी, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथून १. ३ किलो मी पर्यंत शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो कि पळो करून सोडणाऱ्या रणरागिणी, करवीर संस्थापिका सेनानी महाराणी ताराराणी यांना ढोल ताशांच्या गर्जनात, साहसी खेळांच्या रूपात, ढाल – तलवार भगवा फडकवत, इतिहासाचा जागर करत या शोभायात्रेच्या माध्यमातून मानवंदना दिली जाणार आहे. या सोहळ्याला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर हेही उपस्थित असतील.
































