कराड : नवी दिल्ली राष्ट्रीय मानवधिकार राष्ट्रीय सचिवपदी अनिल कचरे यांची निवड झाली. त्यांच्या पदाचे नियुक्तीपत्र नुकतेच त्यांना मिळाले आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
कचरे हे सामाजिक आणि राजकीय अशा विविध स्तरावर ते काम करत असतात व नेहमी कार्यरत असतात. या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रंगराव डवरी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहास सावर्डेकर, सौ. रेनु येळगावकर, सौ. मीरा शिंदे, सौ. ऐश्वर्या राठोड, विकास सकट, राजेंद्र गिरी यांनी निवडीबद्दल कचरे यांचे अभिनंदन केले.
विविध योजना पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे कामत्यांच्या अडीअडचणी व युवकांना नोकरी व सरकारी योजनांमधून गोरगरिबांना कसा लाभ होईल या
पदाच्या माध्यमातून करणार असल्याचे अनिल कचरे यांनी सांगितले.