फलटण : फलटण तालुक्यातील साखरवाडी मध्ये असणाऱ्या दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल शाळेमध्ये २३/७/२००२२ रोजी वन संवर्धन दिन व लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली शिंदे मॅडम उपस्थित होत्या . सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती सांगितली तसेच वनसंवर्धन दिनानिमित्त शाळेमध्ये सर्व विद्यार्थी हिरव्या रंगाचा ड्रेस घालून आले होते. मुलांनी सुंदर अशी कार्डशिट पेपर पासून झाडे बनवली होती तसेच वनसंवर्धन आधारित सुंदर असे चित्र काढली होती. तसेच काही मुलांनी झाडाच्या पानांपासून मुकुट हार असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य बनवले होते .व मुलांनी आपल्या वेगवेगळ्या कलाकृतीतून वन संवर्धन विषयी लोकांना संदेश दिला ,झाडे लावा झाडे वाचवा,. पाण्याला वाचवाल तर तुम्ही वाचाल ,अशा अनेक संदेशांमधून वनसंवर्धनाची माहिती मुलांनी आपल्या कलाकृतीतून सर्वांना दिली. अशा प्रकारे लोकमान्य टिळक जयंती व वनसंवर्धन दिन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम ,शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार , शिवगंगा पवार सविता जगताप, संध्या जगताप, स्नेहल पवार, वर्षा खोमणे, सुषमा गायकवाड उपस्थित होत्या.