महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बारामती
बारामती तालुक्यातील गोजुबावी येथील एका रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.सदर व्यक्ती दौंड येथील भंगार विक्रेता असून दौंड येथील रहिवासी आहे. गोजुबावी येथे त्याचे आई वडील राहत असून त्यांना भेटण्यासाठी आला होता .एक दिवस घरीच राहिल्यानंतर त्याला सर्दी ताप व घश्यात खवखवण्याचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यामुळे रुई येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले असता घशातील स्रावाचा नमुना घेतला असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दौंड मध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे सदर व्यक्ती दौंड येथील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आला असण्याची श्यक्यता आहे.
गोजुबावी गावची सीमा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोजकुमार खोमणे यांनी दिली. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात अली आहे. तरी सर्व बारामतीतील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लॉकडाऊन शिथिलतेचा फायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे सॅनिटायझरचा वापर करणे हे देखील महत्वाचे आहे व प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती दादासाहेब कांबळे यांनी नागरिकांना केली आहे.