फलटण प्रतिनिधी. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंदरुड भाजपचे वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी नगरपालिकेचे गटनेते अशोकराव जाधव, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक सचिन अहिवळे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितिन जगताप,तसेच गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना जयकुमार शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्या पद्धतीने मतदार संघात काम करीत आहेत त्यांचे विचाराने या तालुक्यात काम होणे गरजेचे आहे त्या पद्धतीने आंदरुड भाजपचे पदाधिकारी काम करीत आहेत .आज खरे अर्थाने कोविडचे संकटात लोकांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे असे उपक्रम समाजाचे हिताचे असतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक जयकुमार शिंदे यांनी केले.