महाराष्ट्र न्यूज / सुरगाणा : पोलिसांनीच जनतेचे मित्र बनून निःपक्षपातीपणे केलेले काम हे कायदा व सुव्यवस्थेला धरुन असते त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही. असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांनी केले.
सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांची पेठ येथील पोलीस ठाण्यात बदली झाल्याने नागरिकांनी त्यांना साश्रुनयनांनी निरोप दिला. त्यांनी केलेले कोरोना कालावधीतील कार्य वाखानण्याजोगी असल्यामुळे नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या जागेवर येवला पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांची सुरगाणा ठाणे पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
पोलिस हे सर्व सामान्य जनतेचे रक्षक असून हेच केलेले काम पोलिसांना यशस्वी तिकडे घेऊन जाते ज्याप्रमाणे संत हे शांततेचे प्रतीक असतात त्याच प्रमाणे पोलीस देखील संत आणि सैनिकाप्रमाणे शांत असतात. आदिवासी भागात काम करतांना भौगोलिक परिस्थिती त्याचप्रमाणे तेथील मानवी जीवनमूल्यांचा निर्देशांक, राहणीमान, आर्थिक परिस्थिती, साक्षरता, कायद्याची जनजागृती या गोष्टींचा अभ्यास पोलिसां करणे आवश्यक आहे. पोलिसांनी काम करताना सूक्ष्म नजर ठेवून देहबोली व चेहऱ्यावरील हावभावावरून आपल्याकडे दाद मागण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता आला पाहिजे, संवेदनशील तसेच भावनात्मक दृष्टीने केलेले सामाजिक कार्य हे नेहमी चांगलेच असते असे त्यांनी सांगितले.
निरोप समारंभात सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच उपसभापती इंद्रजित गावित, सावळीराम पवार, सुरेश गवळी, सुभाष चौधरी, पत्रकार रतन चौधरी, एकनाथ बिरारी, शाम खैरनार, हिरामण चौधरी, प्रशांत हिरे, रमेश थोरात, राहुल आहेर, धर्मेंद्र पगारिया,एकनाथ भोये, भरत वाघमारे, शामू पवार, अकील पठाण, सागर नांद्रे, आदींसह पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.