महाराष्ट्र न्यूज वाठार स्टेशन प्रतिनिधी : मुकुंदराज काकडे
उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील एका खेड्यात झालेल्या घटनेने संपूर्ण भारतात पडसाद उमटताना दिसून येत आहेत. याच्याच पार्श्वभूमीवर वाठार स्टेशनमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले यामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन एकता महासंघ व शिवसेना, रिपाइं व मित्र पक्षांच्या वतीने भव्य असा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

यावेळी अमोल आवळे म्हणाले की, या हाथरस सारख्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या सारख्या घटना घडल्यानंतर त्या सरकारने शांत न बसता अशी शिक्षा सूनवावी की पुन्हा चुकूनही अशी निंदनीय घटना कोणाकडूनही घडता कामा नये. आवळे पुढे म्हणाले की या हाथरसच्या घटनेने संपूर्ण भारतातील वातावरण खराब झाले आहे लवकरात लवकर आरोपींना शिक्षा मिळावी आणि अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कायदा करण्यात यावा. त्याचप्रमाणे या मोर्चासाठी वाठार स्टेशन विभागातून कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये शिवसेनेचे क्षेत्रप्रमुख अमोल आवळे, रिपाइंचे हेमंत दोरके, हमीदभाई पठाण,इरफान पठाण, सुमित चव्हाण,निस्सार मोमीन,दत्ता जाधव,पांडुरंग मोरे, संतोष मोरे, शेखर कांबळे, श्रीकांत चव्हाण, ओमप्रकाश गुप्ता, राजू मोरे तसेच शिवसेना, रिपाइं, बहुजन एकता महासंघाचे असंख्य कार्यकर्ते या निषेध मोर्चात सामील झाले होते.
































