वाई : नवीन शैक्षणिक वर्षाचे औचित्य साधून स्व. दिनेश ओसवाल स्मृति प्रतिष्ठान ट्रस्ट वाई आणि असंघटित महिला संघटना, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने वाई तालुका पश्चिम भाग शिक्षक प्रसारक मंडळ, बोरगांव संचलित न्यू इंग्लिश स्कूल, बोरगांव येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेश आणि वह्याचे वाटप करण्यात आले.यावेळी स्व. दिनेश ओसवाल स्मृति प्रतिष्ठान ट्रस्टचे संचालक नगरसेवक दिपक ओसवाल, असंघटित महिला संघटनेच्या प्रभारी अध्यक्षा नीताताई ढवण, वाई अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अरुण देव, वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव वाडकर, संचालक के.एल. धनावडे, मुख्याध्यापिका पाठक मॅडम, पाठक सर, संदीप गायकवाड, अशोक येवले आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना दिपक ओसवाल म्हणाले, वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून येथील ग्रामस्थांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आपल्या भागातच न्यू इंग्लिश स्कूल, बोरगांव आणि नांदगणे भागशाळा सुरू करून वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. येथील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे अगदी वाईजवळील कोलन, पसरणी येथील विद्यार्थीही येथे प्रवेश घेत आहेत. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या संस्कार मंदिरातून अनेक विद्यार्थी घडले आहेत आणि घडत आहेत. स्व. दिनेश ओसवाल स्मृति प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून स्व. पोपटलाल ओसवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी कायमच पश्चिम भागात शालेय साहित्य वाटपासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी सुरू केलेली परंपरा जोपासण्यासाठी या भागातील शाळांना लागेल ती मदत करण्याची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना वाईला जावे लागू नये यासाठी येथेच अकरावी-बारावीचे वर्ग सुरू व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासाठी शासनस्तरावर लागणारी सर्वतोपरी मदत करू असेही ते म्हणाले.यावेळी मुख्याध्यापिका पाठक मॅडम यांनी प्रास्तविकात शाळेच्या आजवरच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. नवनवीन शैक्षणिक उपक्रम येथे प्राधान्याने राबवले जातात असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी अरुण देव, लक्ष्मणराव वाडकर आदींनीही मनोगत व्यक्त केले. ….यांनी सूत्रसंचालन तर ….यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थीनींसह पालक बहुसंख्येने उपस्थित होते.चौकट : कोरोना काळात पोपटलाल ओसवाल आणि कांचनभाभी ओसवाल यांचे दु:खद निधन झाल्याने संपूर्ण ओसवाल परिवारावर दु:खाचे सावट पसरले होते.
स्व. दिनेश ओसवाल स्मृति प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी पोपटलाल ओसवाल कायम आग्रही असायचे. वडिलांच्या समाजसेवेचा हा वारसा जतन करण्यासाठी आई वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेऊन दिपक ओसवाल यांनीही सामाजिक कार्यासाठी नव्याने पुढाकार घेतला असून दुर्गम भागात शैक्षणिक मदत पोहोचविण्यासाठी ते आणि त्यांचे सर्व सहकारी सज्ज झाले आहेत.