गेली ७ वर्ष लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदाची उकृष्टपणे कामकाजाची जबाबदारी संभाळणारे, श्री. दत्तात्रय नानासो बिचुकले यांना रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शाहु कलामंदिर सातारा येथे मा. शंभूराजे देसाई गृहराज्यमंत्री महाराष्ट्र सरकार, शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य व दैनिक नवराष्ट्रचे सरव्यवस्थापक राजेंद्र वारलेकर, दैनिक नवभारत व नवराष्ट्रचे प्रमुख श्रीनिवासन यांच्या हस्ते दैनिक नवराष्ट्र, दैनिक नवभारत समुहाच्यावतीने उत्कृष्ट सहकार खात्याचा सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बिचुकले यांनी यापूर्वी १५ वर्ष बावकलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवून त्या ठीकाणी आपल्या कार्याचा उत्कृष्ट ठसा उमटवला आहे. बावकलवाडी विकास सेवा सोसायटीचे त्यांनी पाच वर्षे चेअरमनपद भूषवून सोसायटीचे कामकाज पाहिले आहे. सद्या बिचुकले हे ग्रामपंचायत बावकलवाडीचे विद्यमान सदस्य व विकास सेवा सोयायटीचे विद्यमान सदस्य असून ते त्या ठीकाणी उत्कृष्ट कामकाज करत आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे .
बिचुकले यांच्या उल्लेखनीय कार्याचा दैनिक नवराष्ट्र व दैनिक नवभारतने आढावा घेऊन त्यांना उत्कृष्ट सहकार खात्याचा सेवा पुरस्कार देवून सन्मानित केल्याने बिचुकले यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.





























