महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड शहरात दत्तचौक, मंगळवार चौक, शाहू चौक, उपजिल्हा रुग्णालय परिसरात वादळी वाऱयासह झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. शहरातील अनेक दुकानांचे पत्रे, फ्लेक्स बोर्ड, बॅनर उडून गेले आहेत. तसेच वाहनांवर झाडांच्या फांद्या पडल्याने नुकसान झाले आहे. शहरातील अनेक भागात विद्युतवाहक तारा तुटल्याने व विद्युतखांब वाकल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
शुक्रवार सायंकाळी कराड शहरासह ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यात पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाल्याचे वृत्त आहे. तर कराड शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अनेक दुकानांचे पत्रे उडाले आहेत. झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने सुमारे अर्धा तास झोडपून काढत त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.कराडात अनेक ठिकाणी झाडे वादळी वाऱ्यामुळे पडल्यानेठिकाणी वाहतूकीस अडथळा निर्माण झाला. अनेक ठिकाणी वाहनांवर झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मंगळवार पेठ कराड येथे दुकानाचे पत्रे उडून गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कराड शहर परिसरात या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.