फलटण प्रतिनिधी:- माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी पदाचा गैरवापर करून राजाळे येथील पेट्रोल पंपाचा ग्रामपंचायत कर बुडवला असून याप्रकरणी विश्वासराव भोसले व विद्यमान व तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निखिल निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत निखिल निंबाळकर यांनी बोलताना सांगितले की, मौजे राजाळे तालुका फलटण येथील गट नंबर ४२६ मधील १ हे ८८ आर जमीन वाणिज्य प्रयोजनासाठी तहसिलदार फलटण यांच्याकडे बिनशेती/एसआर/१७/२०११ दिनांक ६/९/२०११ रोजी मिनाक्षी विश्वासराव भोसले यांनी बिनशेती केली आहे. तेव्हापासून त्या जागेमध्ये सन २०१३ पासून जयवंत पेट्रोलियम नावे पेट्रोल पंप चालवत आहेत. सदर जागेमध्ये बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव क्रमांक ४/१ दिनांक २१/४/२०१२ रोजी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५२ प्रमाणे ठराव करून बांधकामाची परवानगी ठराव क्रमांक ४/०१ दिनांक २१/४/२०१२ नुसार नोंद करतेवेळी अपुऱ्या बांधकामाची नोंद केली आहे तेव्हापासून म्हणजेच सन २०१३ ते २०२१ पर्यंत ग्रामपंचायत कर भरला नाही असे यावेळी निंबाळकर यांनी सांगितले.
तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यावर सत्तेचा गैरवापर करून व सनदी अधिकारी असल्यामुळे दबाव आणून २०१३ ते २०२२ या कालावधीत कर बुडवून ग्रामपंचायतीची आर्थिक फसवणूक करून सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यावर शासनाच्या महसूल बुडवल्याबद्दल अपात्रता होण्याची कारवाई तसेच दरम्यानच्या कालावधीत ग्रामसेवक असणाऱ्या पदावरती काम करण्याच्या नागरी सेवा शिस्त व अपील सेवा शर्तीनुसार शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याबाबत व मागील व्याजासह बुडवलेला कर वसुल करावा तसेच विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आता चालु वर्षी संगनमताने नोंद लावल्यामुळे पदाचा गैरवापर करून शासनाचा कर बुडवला आहे.
या माजी सदनिय अधिकारी विश्वासराव भोसले यांची बऱ्याच ठिकाणी काळी संपत्ती असून याची तात्काळ ईडीची चौकशी व्हावी. माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले पदावर असताना पदाचा दुरुपयोग करून शासनाचा कर बुडविलेबद्दल त्या प्रकरणी सेवानिवृत्तीनंतरचा लाभ बंद करावा आणि पेट्रोल पंपाचे लायसन रद्द करावे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत असे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा ईशारा यावेळी निखिल निंबाळकर यांनी दिला. सर्व गैरकारभार उघडकीस केल्यामुळे या माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांचेकडून माझे जिवितास धोका आहे असे यावेळी निखिल निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
फलटण येथे पत्रकार परिषदेत बोलताना निखिल निंबाळकर