महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : शेखर सिंह जिल्हाधिकारी सो सातारा. तत्कालीन पंतप्रधान माननीय श्री डॉ मनमोहन सिंग यांनी नेमणूक केलेल्या रिटायर्ड गव्हर्नर श्री रंगराजन यांच्या समितीने राज्य सरकार यांना दिलेल्या ऊस दराच्या 70/30 च्या फॉर्म्युला नुसार तसेच दोन साखर कारखान्यांच्या मधील 25 किलोमीटर ची हवाई अंतराची अट रद्द करून दिलेल्या अहवालाची अमलबजावणी करणे बाबत. जोहरापूर,ता,शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील ऊस उत्पादक शेतकरी कै श्री जनार्दन सीताराम माने यांनी आपल्या उसाला वेळेत तोड न मिळाल्याने केलेल्या आत्महत्ये बाबत.मी विनायक संभाजी जाधव,अध्यक्ष कराड तालुका शेतकरी संघटना आपणांस सविनय निवेदन सादर करतो की गेल्या दोन वर्षात कोरोना काळात ऊस उत्पादक शेतकऱ्याचे संपूर्णतः कंबरडे मोडले असून त्यात कमी की काय म्हणून गेल्या 5 वर्षांपासून आम्हाला अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे, सुलतानी संकट अश्या करता उल्लेख करतो की गेल्या बऱ्याच वर्षांपासून आमच्यावर केंद व राज्य सरकार तसेच सर्व राजकीय पक्ष नेते व सहकारातील पुढारी,विशेषतः सहकारी साखर कारखानदार यांच्या कडून आमच्या विरोधातील धोरणे राबवण्यात येत आहेत.याचाच परिणाम म्हणून दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी अहमदनगर जिल्हा तालुका शेवगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी कै श्री जनार्दन सीताराम माने यांनी आपल्या उसाला जवळपास 20 महिन्यांपासून सर्व प्रयत्न करून सुद्धा तोड मिळाली नाही म्हणून त्याच उसाला आग लावून त्याच शेतात विष प्राशन करून दुर्दैवी आत्महत्या केली.
महोदय हे संकट आता आमच्या शेतकरी बापाचे व आमचे जीव घेत आहे त्याचे हे एक उदाहरण आहे आणि म्हणून आमच्या संघटनेचे सर्वेसर्वा आदरणीय श्री रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही वर्षांपूर्वी आंदोलने झाली होती व त्यानुसार तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी आदरणीय श्री रघुनाथ दादा यांच्या सोबत काही बैठका घेऊन त्या वेळी रिटायर्ड गव्हर्नर श्री रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती त्या नुसार ऊस उत्पादक शेतकऱ्याला 70/30 च्या फॉर्म्युला नुसार भागीदारी व दोन साखर कारखान्यांच्या मधील हवाई अंतराची अट रद्द करणे व इथेनॉल उत्पादन करण्यास परवानगी देने अश्या अनेक शिफारशी केल्या होत्या व त्या शिफारशी केंद्र सरकारने राज्य सरकार ला लागू करण्यास सांगितल्या होत्या परंतु त्यानंतरच्या कोणत्याही राज्य सरकारने या शिफारशी लागू केल्या नाहीत उलट कर्मी आम्हालाच हाता पाया पडून आमचा ऊस न्या असं म्हणवण्याची वेळ आणली आणि त्याचाच परिणाम म्हणून आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.खरंतर या आत्महत्या नसून सर्व राजकीय पुढाऱ्यांनी केलेल्या हत्या आहेत असे आमचे म्हणणे आहे, आणि म्हणून या शिफारशी लागू करण्याकरिता व विशेषतः दोन साखर कारखान्यांच्या मधील हवाई अंतराची अट काढून टाकण्यात यावी या करिता मी आपल्या कार्यालया समोर दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी माझ्या सहकाऱ्यांसोबत व आदरणीय श्री रघुनाथ दादा यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे,या मागचा हेतू असा आहे की भविष्यात हवाई अंतराची अट व इतर शिफारशी लागू झाल्यास इतर नवीन कारखाने निघून प्रतिस्पर्धा वाढेल व आमच्या उसाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळून आमचा ऊस वेळेत नेला जाईल व आमचे जगणे सुखाचे व सन्मानाचे होईल .