महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : दहिवडी
मायणी ब्रिटिशकालीन तलावातील पाण्याचे खणा-नारळाने ओटी भरून जलपूजन
फ्रेंड्स ग्रुपने या ब्रिटिशकालीन तलावाची गळती काढल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी येथील ब्रिटिशकालीन तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे मायणीसह परिसरातील शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.फ्रेंड्स ग्रुपने सातत्याने विविध क्षेत्रातील चांगली कामे समाजापर्यंत पोचविण्याचे काम गेले कित्येक वर्षे सुरू ठेवले आहे नेहमीच विविध कामातून जनजागृती केल्याने फ्रेड्स ग्रुपला” मायणीकरांच्या मनात मानाचे स्थान असल्याचे प्रतिपादन मार्केट कमिटीचे माजी संचालक दादासाहेब कचरे यांनी केले. ते फ्रेंड्स ग्रुप ने आयोजित केलेल्या मायणी ब्रिटिश कालीन तलावातील पाण्याच्या जलपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते
यावेळी मार्केट कमिटीचे संचालक किरण देशमुख,माजी सरपंच प्रकाश कणसे,वनाधिकारी संजीवनी खाडे,फ्रेड्स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव,संदीप कुंभार, तलाठी शंकर चाटे,पोलीस पाटील प्रशांत कोळी,जेष्ठ पत्रकार प्रकाश सुरमुख,ग्रामपंचायत सदस्य विनोद पवार,सौ.अर्चना जाधव,मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षा सौ,रंजना सानप,सौ.अँड.आरती कोळी,यशवंत शेंडे,विकी सूरमुख,अविनाश शिंदे,अजय दगडे,शुभम चव्हाण,ओमसाई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कचरे म्हणाले १८७६ चा दुष्काळामध्ये ब्रिटिशांनी मायणीसह रानंद,आंधळी ता.माण हे तलाव बांधले आहेत.मायणी तलावावर सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा शेती पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. दुसऱ्या वर्षी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेती पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.सामाजिक क्षेत्रात सतत विविध कार्य करत असलेल्या फ्रेंड्स ग्रुपने सातत्याने मायणी तलाव परिसरामध्ये विविध विकास कामे हाती घेऊन ती मार्गी लावली आहेत.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सुरमुख म्हणाले गतवर्षी झालेल्या अवकाळी पावसा मध्ये हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता त्याही वर्षी फ्रेंड्स ग्रुपने जलपूजन केले होते. याही वर्षी समाधानकारक पाऊस झाला व तलाव पूर्ण क्षमतेने भरला त्यामुळे जलपुजनाचा योग पुन्हा मिळाला.आता परिसरामध्ये टेंभू ,तारळी अशा विविध योजनांचे पाणी येणार आहे वरुण राजाची कृपादृष्टी अशीच राहिली तर येथून पुढे कधीही तलावातील पाणी कमी होणार नाही असे बोलताना यावेळी त्यांनी स्पष्ट केले
मानवाधिकार संघटनेच्या खटाव तालुका अध्यक्ष रंजना सानप म्हणाल्या समाजातील वंचितांसाठी, दुर्लक्षितांसाठी, शोषितांसाठी मोलाचे कार्य फ्रेड्स ग्रुपच्या हातून घडत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
पावसामुळे भरलेल्या या तलावातील जलपूजन होणे गरजेचे असते या पाण्यावर आपली उपजीविका सुरू असते फ्रेंड्स ग्रुपने योग घडून आणला ही सर्वांसाठी एक समाधानाची बाब आहे.कार्यक्रमाचे आभार प्रशांत कोळी यांनी मानले.