पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित…….
अविष्कार ॲग्रो कंपनीच्या महिला कामगारांवर करत असलेला अन्यायाविरोधात दि. ७/५/२०२२ रोजी लोकजनशक्ती पार्टीने अविष्कार कंपनीला टाळे ठोक आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून या आंदोलना साठी महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सातारा जिल्ह्यातून शेकडो लोकजनशक्ती पार्टीचे कार्यकर्ते कडक उन्हाचा तडका असून देखील मोठ्या संख्येने जमले होते. पोलिसांनी पाच ते सहा दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले असल्यामुळे व पोलिस प्रशासनावरील वाढत असलेला कामाचा ताण व कमी मनुष्यबळ पाहता येणाऱ्या पाच ते सहा दिवसात पोलीस प्रशासन कंपनीवर गुन्हे दाखल करणार आहे. अशा स्वरूपाचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिल्यामुळे लोकजनशक्ती पार्टीने दिनांक ७/५/२०२२ रोजीचे टाळे ठोक आंदोलन तात्पुरते स्थगित केली असून जर येणाऱ्या आठ ते दहा दिवसात कंपनीने महिला कामगारांचे ओव्हर टाईम केलेल्या कष्टाच्या कामाचा व इथून मागे न दिलेला बोनस दिला नाही आणि महिला कामगारांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून कंपनीला टाळे ठोकणार असून अविष्कार ऍग्रो कंपनीतील कामगारांच्या न्याय हक्कासाठी वेळ प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला किंवा वेळ प्रसंगी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण कंपनीला टाळे ठोकल्याशिवाय शांत बसणार नाही असे लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय काका गायकवाड यांनी सांगितले.
वेळप्रसंगी अन्याय करणाऱ्यांना पुन्हा पुण्याला पाठवु
महिला कामगारांवर अन्याय करणाऱ्या व त्यांचे कष्टाचे पैसे बुडवणाऱ्याची लोकजनशक्ती पार्टी कडून गय केलीजनार नाही कामगारांच्या हक्कासाठी वेळप्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणारच