वाहतूक पोलिस कर्मचारी पूजा पाटील यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्ताचे प्राण वाचले.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : येथील विजय दिवस चौकात आज सायंकाळी झालेल्या दूचाकी अपघातात महिला वहातूक पोलिस कर्मचार्याने दाखवलेल्या प्रसंगावदानाने आज एका दूचाकी चालकाचा प्राण वाचले आहेत.कराड शहर वहातूक पोलिस विभागाच्या पूजा पाटील यांनी अपघात घडल्या क्षणी तात्काळ जखमीस रूग्णालयात दाखल करून आपले कर्तव्य बजावल्याने दूचाकी चालकाचे प्राण वाचले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनूसार आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सूमारास कृष्णा रघुनाथ रासकर (वय 57) रा. विद्यानगर-सैदापुर यांचा विजय दिवस चौकात आपल्या दुचाकीवरील ताबा सुटूल्याने अपघात झाला. या अपघातात रासकर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. याचवेळी या चौकात कर्तव्य बजावत असणाऱ्या वहातूक विभागाच्या महिला पोलिस कर्मचारी पूजा पाटील यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ मदत करण्यास सूरूवात केली,जखमी दूचाकी चालकाच्या डोक्यातून जास्त रक्तश्राव होत असल्याने पूजा पाटील यांनी रूग्णवाहिकेची वाट न पहाता जखमी रासकर यांना तात्काळ रिक्षातून सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान काॅटेज येथे प्राथमिक उपचार नंतर सबंधित जखमीस पूढील उपचारासाठी कृष्णा हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले.यावेळी पूजा पाटील यांनी सबंधित जखमी रासकर यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून झालेल्या अपघाताची माहिती दिली असून कृष्णा रूग्णालयात रासकार यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.शहर वाहतूक पोलिस कर्मचारी पूजा पाटील या आपले कर्तव्य बजावत असताना अपघातग्रस्ताला तात्काळ मदत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी त्यांना होमगार्ड सागर पावणे यांनीही कर्तव्य बजावत असताना मदत केली आहे.