महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर): शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील बावडा येथे नीरा – भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते सुर्यकांत शिंदे व चंद्रकांत शिंदे या बंधुंनी नवीन सुरू केलेल्या ‘ प्रणाली कनेक्शन ‘ या रेडीमेड कपड्यांच्या व्यवसायाचा शुभारंभ संपन्न झाला.
शिंदे बंधू यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर व प्रामाणिकपणे कापड व्यवसायीक क्षेत्रात आपला ठसा उमटावा . छोट्या व्यवसायापासून सुरवात करून त्यांनी त्याचे रूपातंर मोठ्या रेडीमेड दुकानात केले आहे. कापड व्यवसायात अशीच उंच भरारी घेत यशाची शिखरे गाठत आपली व्यवसायीक प्रगती करावी , अशा शुभेच्छा दिल्या.






















