
कळंब/प्रतिनिधी/शहाजीराजे भोसले :
इंदापूर येथे शुक्रवार , दि.१० जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती . सभेत कळंब ( ता. इंदापूर ) येथील दत्तात्रय घोडके यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली . तसेच नवीन पदाधिकारी निवडण्यात आले .
पदाधिकारी निवडीत प्रामुख्याने महासचिवपदी सागर ( दादा ) लोंढे , उपाध्यक्षपदी प्रमोद ( दादा ) चव्हाण , हनुमंत बनसोडे , सचिन गायकवाड व शहराध्यक्षपदी हनुमंत कांबळे , संघटक सदस्यपदी नाना बनसोडे आदींची निवड करण्यात आली .
अध्यक्ष निवडीनंतर बोलताना घोडके यांनी सांगितले की, तळागाळातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ व फायदा मिळवून देणार व वंचित बहुजन आघाडीमार्फत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समर्थक कार्यकर्ते , धम्माकुर मैत्री संघ , बुध्द विहार वालचंदनगरचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















