महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी लोणी भापकर :
गेली तीन दिवस पावसाने लोणी भापकर परिसरात कहर केला असून त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.या पावसाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे लोणी भापकर ,पळशी, मासाळवाडी, मोराळे,कानडवाडी या परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केलेले आहे.
सर्वदूर सातत्याने कोसळलेल्या पावसाने सर्वत्र थैमान घातलेले आहे. पावसाचे पाणी शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात साचून असल्याने कांद्याचे पीक तसेच ज्वारीचे पीक जळू लागली आहेत, या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला आहे व त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे.






















