बाळासाहेब देसाई कॉलेज मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न21 विद्यार्थ्यांची निवड
पाटण प्रतिनिधी: पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालय व टीएम ऍटोमोटीव सिटींग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ग्रुप कंपनी ऑफ टाटा ऍटोकॉम्प यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 11 रोजी बाळासाहेब देसाई महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच इतर महाविद्यालयातील विद्यार्थींनाही संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.आयटीआय व पदवीधर विद्यार्थ्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया होणार असून विद्यार्थ्यांनी मुलाखतीस येताना आपला बायोडाटा व शैक्षणिक सर्व कागदपत्रे घेवून सोमवार दि. 11 रोजी सकाळी 11 वाजता बाळासाहेब देसाई महाविद्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहनही प्राचार्य डॉ. पवार यांनी केले होते.महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेलच्यावतीने घेण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेमध्ये 38 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अॅप्टिट्युड, कम्युनिकेशन व टेक्निकल अशा तीन टप्या मधून विद्यार्थी पुढे गेल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड अंतिम मुलाखतीकरिता झाली. असोसिएट ट्रेनी, लाईन ऑपरेटर ,स्टोअर विभाग या पदांकरिता सदर निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये 21 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
महाविद्यालयातील या कॅम्पस ड्राईव्हमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, संचालक याज्ञसेन पाटणकर, संजीव चव्हाण, बाळासाहेब देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. संदीप तडाखे, सदस्य प्रा.अमोल मोहिते यांचेही कॅम्पस ड्राईव्हच्या उत्तम आयोजनाबद्दल कौतुक केले आहे.